शेतकरी तक्रारींवर तडजोड नाही

शेतकरी तक्रारींवर तडजोड नाही
Published on

जुईनगर, ता. १६ (बातमीदार) : राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाची सूत्रे नव्याने स्वीकारल्यानंतर सचिव राजाराम धोंडकर यांनी प्रशासकीय इमारतीत पाचही बाजारपेठांतील विभागप्रमुखांची बैठक घेत बाजारातील प्रमुख समस्या, शेतकरी व मालधनींच्या तक्रारी तसेच बाजारातील पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाला या पाच बाजारपेठांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक होत असते. त्यामुळे या बाजारपेठांमधील कामकाज सुरळीत राहणे आणि शेतकरी तसेच मालधनींना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर सचिव धोंडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागनिहाय माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

या आढावा बैठकीला पाचही बाजारपेठांतील उपसचिव, अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी तसेच स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नव्या सचिवांनी पदभार स्वीकारताच घेतलेल्या या बैठकीमुळे बाजार समितीतील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता दोन दिवसांत समोर येणाऱ्या अहवालानंतर प्रशासन कोणत्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देते आणि त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com