बीएएमएस, बीएचएमएस आदींच्या प्रवेश नोंदणीला सुरूवात

बीएएमएस, बीएचएमएस आदींच्या प्रवेश नोंदणीला सुरूवात
Published on

बीएएमएस, बीएचएमएस
इत्यादींच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात
मुंबई, ता. १६ : राज्यातील आयुर्वेद-बीएएमएस, होमिओपॅथी-बीएचएमएस, युनानी-बीयूएमएस आणि इतर वैद्यकीय बीपीटी, बीओटी, बीएएसएलपी, बीपीअँडओ आणि बीएनवायएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश नोंदणीस सुरुवात झाली आहे. प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १८ सप्टेंबर आहे. पहिली गुणवत्ता यादी २७ सप्टेंबरला जाहीर करण्यात येईल. २०२६ मध्ये नीटमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
या अभ्यासक्रमासाठी २०२६ मध्ये जे विद्यार्थी नीट या प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झाले आहेत, ते विद्यार्थी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यास पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करण्यात यावी. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रांसह पडताळणी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र सादर करावे. तसेच ईडब्ल्यूएसचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध असलेले ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र जे आवश्यक आहे ते सादर करणे आवश्यक आहे.
--
कॅप फेरीचे-१ प्रवेशाचे वेळापत्रक
उपक्रम वेळापत्रक
प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी १४ ते १८ सप्टेंबर सायंकाळी ५.०० पर्यंत
पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करणे १४ ते १८ सप्टेंबर रात्री १०.०० पर्यंत
केंद्राद्वारे दस्तऐवज पडताळणी १५ ते १९ सप्टेंबर
नोंदणीकृत उमेदवारांच्या यादीची प्रसिद्धी २० सप्टेंबर
अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी २४ सप्टेंबर
ऑनलाइन पसंतीक्रम भरणे २४ ते २६ सप्टेंबर रात्री ११.५९ पर्यंत
पहिली गुणवत्ता यादी २७ सप्टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com