भुयारी मेट्रोच्या प्रभाव क्षेत्रात बांधकाम करायचंय; एनओसीसाठी लाखो रुपये मोजा

भुयारी मेट्रोच्या प्रभाव क्षेत्रात बांधकाम करायचंय; एनओसीसाठी लाखो रुपये मोजा
Published on

एनओसीसाठी आता शुल्क आकारणी
भुयारी मेट्रोच्या प्रभाव क्षेत्रात बांधकामाबाबत एमएमआरसीचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त गारेगार प्रवास करता यावा म्हणून एमएमआरसीएलने सुमारे ३२ किलोमीटर लांबीची आरे-कफ परेड भुयारी मेट्रो मार्गिका उभारली आहे. या मेट्रो मार्गिकेच्या प्रभावित क्षेत्रात बांधकाम करायचे असेल, तर आता लाखो रुपये खर्चून एनओसीचा अर्ज घ्यावा लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय एमएमआरसीने जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार आहे.
मुंबई मेट्रो मार्गिका-३ ही संपूर्ण भुयारी असल्याने बोगद्याच्या स्ट्रक्चरला कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे मार्गिकेच्या अधिसूचित प्रभाव क्षेत्रात बांधकाम किंवा विकासकाम करण्यापूर्वी मेट्रो रेल्वे (कामांचे बांधकाम) अधिनियम, १९७८ नुसार एमएमआरसीची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. आतापर्यंत मेट्रोच्या बांधकाम काळात हे तांत्रिक परीक्षण जनरल कन्सल्टंटमार्फत विनाशुल्क केले जात होते. आता मेट्रो कार्यान्वित झाली असून, कन्सल्टंटच्या सेवा संपल्याने एमएमआरसीने विशेष तज्ज्ञ संस्थांचे पॅनेल तयार केले आहे. त्यानुसार ३० सप्टेंबरनंतर प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांसाठी एक लाखापासून साडेपाच लाखांपर्यंत एनओसी शुल्क लागू असणार आहे. या निर्णयामुळे मेट्रो मालमत्तेची सुरक्षितता अबाधित ठेवणे शक्य होणार असून, विकास प्रस्तावांचे वेळेत परीक्षण होण्यास मदत होणार आहे.

असे असेल शुल्क...
मेट्रो मार्गिकेपासून किती अंतरावर विकासकाम, बांधकाम केले जाणार आहे, त्यानुसार शुल्क लागू होणार आहे.
- ० ते ६ मीटर अंतर (अत्यंत संवेदनशील) - ५ लाख ५० हजार रुपये
- ६ ते २० मीटर अंतर (मध्यम) - ३ लाख ३० हजार रुपये
- २० मीटरपेक्षा जास्त अंतर (सामान्य) - १ लाख १० हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com