

अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरसाठी
एमएमआरडीएचा आधुनिक कचरा प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर शहरांतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएकडून उभारण्यात येत असलेल्या एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. दररोज ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीनही शहरांतील कचरा व्यवस्थापनाला मोठी चालना मिळणार आहे.
केएफडब्ल्यू-मुंबई मेट्रोपोलिटन रिजन अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅमअंतर्गत बदलापूर येथे हा आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. बीओटी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा आणि शास्त्रोक्त सॅनिटरी लँडफिलचा समावेश आहे. कचरा कमी करणे, पुनर्वापरयोग्य संसाधनांची पुनर्प्राप्ती करणे आणि उर्वरित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, या तत्त्वांवर प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे तीनही शहरांमधील कचरा व्यवस्थापनाची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
-------
प्रदूषण रोखण्यास हातभार
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच दुर्गंधी, रोगवाहक कीटक आणि कचऱ्याला लागणाऱ्या आगीचे धोकेही कमी होतील. तसेच मिथेन उत्सर्जनाला आळा बसण्यास मदत होईल. लिचेटवर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्यामुळे माती आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासही हातभार लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.