

‘शिवनेरी’मध्ये गणेशोत्सवाच्या नव्या परंपरेची सुरुवात
पनवेलकरांसाठी अभिमानाचा क्षण; महापौर निवासस्थानी प्रथमच गणरायाचे मंगलमय आगमन
पनवेल, ता. १७ (बातमीदार) ः पालिकेच्या वतीने खारघर सेक्टर २१ येथे उभारलेल्या ‘शिवनेरी’ या अत्याधुनिक महापौर निवासस्थानी यंदा प्रथमच श्री गणराय विराजमान झाले आहेत. लोकार्पणानंतरच्या या पहिल्याच गणेशोत्सवामुळे एका नव्या प्रथा व परंपरेची सुरुवात झाली आहे.
पनवेल पालिकेच्या महापौर निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (ता. १०) आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. लोकार्पणानंतर यंदा या निवासस्थानी प्रथमच गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महापौर निवासस्थानी विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले. या वेळी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या १० वर्षांत पनवेल पालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे आणि महत्त्वाचे प्रकल्प साकारण्यात आल्याचे सांगितले. महापौर निवासस्थानाची उभारणी ही पालिकेसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकाराचेही त्यांनी कौतुक केले. भविष्यात पनवेल महापालिका एमएमआर क्षेत्रातील प्रमुख महापालिकांपैकी एक म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.