श्री गणेशाची मूर्ती व न्युज पेपर व टिशू पेपर यांच्यापासून बनवलेला राजवाडा

श्री गणेशाची मूर्ती व न्युज पेपर व टिशू पेपर यांच्यापासून बनवलेला राजवाडा
Published on

वृत्तपत्र, टिश्यू पेपरच्या सहाय्याने राजवाडा देखावा
नेरूळ, ता. १७ (बातमीदार) ः लायन हार्ट ग्रुप फाउंडेशन आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा आकर्षक आणि पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. मंडळाने काळ्या चिखलमातीपासून घडवलेली श्री गणेशाची मूर्ती आणि रद्दी वृत्तपत्रे व टिश्यू पेपरचा वापर करून राजवाडा उभारला असून, हा नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा रेखाटला आहे. तसेच २०२० वर्षीच्या देखाव्यात संस्थेने पुठ्ठ्यापासून श्री स्वामी समर्थांचे मठ व झाडे असा डेकोरेशन व लाल मातीपासून श्री स्वामी समर्थांची मर्ती असा पर्यावरणपूरक देखावा जनतेसमोर रेखाटला होता. २०२१ वर्षीच्या देखाव्यात संस्थेने सांगली कोल्हापूर येथील परिस्थिती पाहता त्यावर आधारित एक चित्रफित तयार केली होती. त्या चित्रफितचे नाव सांगली कोल्हापूर हृदयस्पर्श घटना होते, तर २०२२ मध्ये कोरोना योद्धांचा सन्मान हा देखावा सादर केला होता २०२३ मध्ये ग्रीन व्हॅली व कैलास पर्वताचा देखावा सादर केला होता, तर २०२४ मध्ये नारळाच्या जावल्या, रस्सी, पत्रावाल्या यापासून पर्यावरणपूरक डेकोरेशन देखावा सादर केला होता. २०२५ वर्षीच्या देखाव्यात संस्थेने चुन्यापासून बनवलेला राजवाडा व चिनी मातीपासून बनवलेला बालगणेशाचा पर्यावरणपूरक देखावा जनतेसमोर रेखाटला होता, असे संस्थेच्या सदस्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com