पिवळा बंगला बस थांबा झाला स्वच्छ

पिवळा बंगला बस थांबा झाला स्वच्छ
Published on

पिवळा बंगला बस थांबा झाला स्वच्छ
‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; कचरा हटवून परिसराची साफसफाई
धारावी, ता. १७ (बातमीदार) : धारावीतील पिवळा बंगला परिसरातील राजीव गांधी नगरसमोरील ‘धारावी कोळीवाडा’ या ‘बेस्ट’ बस थांब्याजवळ साचलेल्या कचऱ्याची अखेर महापालिकेने साफसफाई केली. ‘सकाळ’च्‍या ८ सप्टेंबरच्‍या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने थांब्यासमोरील कचरा हटवून परिसर स्वच्छ केला.
पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या या बस थांब्यावरून सायन, कुर्ला, चेंबूर आदी भागांत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. माहीम, वांद्रे आदी भागांतून येणाऱ्या ‘बेस्ट’ बस पकडण्यासाठी धारावीतील विद्यार्थी, कामगार आणि नागरिक या थांब्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून बस थांब्यासमोरील कचरा पेटीजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. कचरा रस्त्यावर पसरल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती. त्यामुळे बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसह राजीव गांधी नगरमधील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. नाइलाजाने प्रवाशांना नाकाला रुमाल लावून बसची वाट पाहावी लागत होती.
‘बेस्ट’ बसचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने धारावीतील विद्यार्थी आणि कामगार मोठ्या प्रमाणावर या सेवेचा वापर करतात. त्यामुळे बस थांब्यांवरील मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेकडे महापालिका व ‘बेस्ट’ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून होत होती. दरम्यान, ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत कचरा हटवून परिसर स्वच्छ केल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक खुर्शीद शेख यांनी समाधान व्यक्त केले. बस थांब्याची स्वच्छता नियमित ठेवण्यासाठी महापालिका आणि ‘बेस्ट’ प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com