वसई - विरार शहरात १ हजार ७०९ गौराईचे आगमन

वसई - विरार शहरात १ हजार ७०९ गौराईचे आगमन
Published on

वसई-विरार शहरात १,७०९ गौराईंचे आगमन

पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत महिलांचा उत्साह

वसई, ता. १७ (बातमीदार) : पारंपरिक रूढी, परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या वसई नगरीत गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. वसई-विरार शहरात गुरुवारी लाडक्या गौरीचे आगमनदेखील जल्लोषात करण्यात आले. चिंब पावसात भिजत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पारंपरिक वेशभूषा करून महिला सहभागी झाल्या होत्या. गौराईचे गुणगान गाणारी पारंपरिक गाणी, नृत्यातून वातावरण आनंदी झाल्याचे दिसून आले.
वसईच्या किनारपट्टीवर गौरी पूजन करण्यात आले. घरी गौराईचा साज शृंगार करून साडीचोळी नेसवली जाणार आहे. अंगणात रांगोळीचा सडा काढण्यात येणार आहे. वसई पश्चिम येथील दिवाणमान येथे आगरी महिलांनी गौरीची मूर्ती आणण्यासाठी वसई गाव ते दिवाणमान असा प्रवास केला. अर्नाळा, नायगाव कोळीवाडा, कळंब, राजोडी, नवापूर, खोचिवडे, कामण, मेढे-आडणे, भिनार, करंजोण, शिरसाड, सातिवली, उमेळमान यासह वसई तालुक्यात गौराईचे आगमन पारंपरिक पद्धतीने झाले.
----------------------------------------------------------------------------------
माहेरवाशीन म्हणून येणाऱ्या गौराईची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. पारंपरिक पद्धतीने गावातील महिलांनी गौरी पूजन केले. मिरवणूक काढत लाडक्या गौराईला घेऊन आलो. या उत्सवातून सामाजिक एकोपा जपला जात आहे.
- ज्योत्स्ना पाटील, दिवाणमान, वसई
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आनंद व भक्तिमय वातावरण
विशेष म्हणजे महिलांचा अधिक उत्साह दिसून येत आहे. नववधू नटूनथटून गौरीची ओटी भरणार आहेत. पुरणपोळी, अळूच्या पानांचे पातवड, दूधभात, करंजी असा नैवेद्य ज्येष्ठ गौरीला दाखवला जाणार आहे. वसई ग्रामीण भागात दिंडीची कर्दळी, कंटोळी वेल, रंगीत फुले, कलई, शिराळा पाने, गवत यांचा वापर करून गौरी सजवण्यात येणार आहेत.
------------------------------------------------
वसई - विरार शहर गौरी मूर्ती
सार्वजनिक ३४
खासगी - १,६७५
१,७०९
------------------------------------------------
वसई : पारंपरिक पद्धतीने गौरीचे मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महिलांमध्ये अनोखा उत्साह दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com