गं पोरी गवर आली…

गं पोरी गवर आली…
Published on

गं पोरी गवर आली…

माहेरवाशीण गौरींचे सर्वत्र उत्साहात स्वागत

विक्रमगड, ता. १७ (बातमीदार) : गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या म्हणून पूजल्या जाणाऱ्या गौरींचे गुरुवारी विक्रमगड तालुक्यातील शहरासह गाव-खेड्यापाड्यांमध्ये उत्साहात आगमन झाले. माहेरवाशीण म्हणून गौरींचे स्वागत करण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने जपली जात असून, महिलांनी गौरीचे आकर्षक मुखवटे आणि विविध अलंकारांनी गौरींची सजावट केली. पारंपरिक पद्धतीने गौरींची प्रतिष्ठापना करून त्यांना साजशृंगार केला. विक्रमगड शहर तसेच ग्रामीण भागात १७ सप्टेंबर रोजी गणरायासोबत गौरींचे आगमन झाले. काही कुटुंबांमध्ये तांब्याच्या गौरी तर अनेक ठिकाणी फुलांच्या खंड्यांच्या तसेच पाना-फुलांच्या गौरी बसविण्याची प्रथा आहे.

ग्रामीण भागात पाना-फुलांची गौरी :
विक्रमगड तालुक्यातील अनेक गाव-खेड्यापाड्यांमध्ये पाना-फुलांपासून गौरी तयार करून त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. विशेषतः कुणबी समाजामध्ये गौरी पूजनाला विशेष महत्त्व असून, पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या परंपरा आजही श्रद्धेने जपल्या जात आहेत.
पूर्वजांची परंपरा आजही दिमाखात :
विक्रमगड शहरातील अवंतिका अतुल वाडेकर यांच्या कुटुंबातही गेल्या अनेक वर्षांपासून पूर्वजांनी सुरू केलेली गौरी पूजनाची परंपरा कायम आहे. आधुनिक काळातही पारंपरिक सण-उत्सवांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीचे जतन करण्याचा हा प्रयत्न विशेष ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com