‘संगणक अभियांत्रिकीच्या प्रवेशाने गाठला २८ चा टप्प हजार प्रवेश

‘संगणक अभियांत्रिकीच्या प्रवेशाने गाठला २८ चा टप्प हजार प्रवेश
Published on

‘संगणक अभियांत्रिकीच्या
प्रवेशाने गाठला २८ हजारांचा टप्पा
मुंबई, ता. १७ : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील एकूण ३८७ अभियांत्रिकी महाविद्यालयांतून १११ अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये एक लाख ८१ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये एक लाख १४ हजार १२१ विद्यार्थी तर ६७ हजार ८०६ विद्यार्थिनी आहेत. मागील वर्षी २०२५-२६ मध्ये एक लाख ६६ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. यानुसार मागील वर्षापेक्षा १५ हजार १८१ जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विद्यापीठांतर्गत प्रवेशामध्ये राज्यात सर्वाधिक ६४ हजार ८२२ विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला असून, जिल्हानिहाय प्रवेशामध्येही राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४९ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यावर्षी अभियांत्रिकीच्या १११ विषयांच्या शाखेमधून संगणक अभियांत्रिकी या शाखेमध्ये सर्वाधिक २८ हजार १७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
अनुक्रमे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिव्हील इंजिनियरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग), आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अँड डाटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग (डाटा सायन्स), इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स व केमिकल इंजिनियरिंग या शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
राज्यात यावर्षी जिल्हानिहाय प्रवेशामध्ये ४९ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. या खालोखाल १८ हजार ९२१ विद्यार्थ्यांनी नागपूर जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. यानंतर १२ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच ११ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी मुंबई उपनगर आणि ११ हजार २३६ विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश घेतला आहे. यानंतर अनुक्रमे कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर व रायगड जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश घेतला आहे.
--
अभियांत्रिकीचे शाखानिहाय प्रवेश
अभियांत्रिकी शाखा झालेले प्रवेश
कॉम्प्युटर इंजिनियरिंग २८,१७०
मेकॅनिकल इंजिनिअरिंग १९,७०२
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि. इंजि. १८,८९५
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग १८,२७७
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी १५,२१९
सिव्हील इंजिनियरिंग १४,२१३
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ११,७२६
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स १०,५०२
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग ६,६५०
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ४,६०६
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अँड डाटा सायन्स ४,११५
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग (डाटा सायन्स) ३,५१२
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनियरिंग ३,२५७
इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स १,६४९
केमिकल इंजिनियरिंग १,६३४
--
जिल्हानिहाय प्रवेश
जिल्हा झालेले प्रवेश
पुणे ४९,६१६
नागपूर १८,९२१
नाशिक १२,४६९
मुंबई उपनगर ११,४२१
ठाणे ११,२३६
कोल्हापूर १०,८२८
अहिल्यानगर ६,७०५
छत्रपती संभाजीनगर ६,४५१
सोलापूर ५,९६२
रायगड ५,३२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com