

मालवणीत गटाराची भिंत खचली; ज्येष्ठ महिला थोडक्यात बचावली
मालाड, ता. १७ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी क्रमांक ३ येथील बेकरीलगतच्या गटाराची भिंत खचल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. बुधवारी (ता. १६) किराणा सामान घेऊन घरी परतणाऱ्या सीमा ठाकूर या ज्येष्ठ महिला गटाराची भिंत अचानक कोसळल्याने तोल जाऊन पडल्या. त्यांच्या हातातील किराणा सामानही खाली पडले. सुदैवाने या वेळी तेथून जाणाऱ्या मनोज त्रिपाठी यांनी धाव घेत ज्येष्ठ महिलेला सावरल्याने मोठी दुर्घटना टळली.
या गटाराची मागील १५ वर्षांपासून दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे, मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे गटारावरील ढापे तुटले असून, चिंचोळ्या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना गटारात पडण्याची भीती आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून, या परिसरातील सुमारे अडीच हजार लोकवस्तीतील २० ते २५ घरांमध्ये पाच व दहादिवसीय घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी भाविकांना याच चिंचोळ्या रस्त्यावरून जावे लागणार आहे. पर्यायी मार्ग नसल्याने विसर्जनावेळी गटारात पडून दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. येथे कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी सरोज स्वामी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.