

सेवा संकल्प अभियानाची नवी मुंबईत अनोख्या उपक्रमाने सुरुवात
स्वच्छ भारत अभियानाच्या बोधचिन्हाची स्वच्छताकर्मींनी साकारली भव्य मानवी रांगोळी
वाशी, ता. १७ (बातमीदार) ः सेवा संकल्प अभियानाची नवी मुंबई पालिकेच्या वतीने अनोख्या उपक्रमाने सुरुवात करण्यात आली. महापालिका मुख्यालयासमोरील हिरवळीवर स्वच्छताकर्मींनी एकत्र येत महात्मा गांधी यांच्या चष्म्याच्या स्वरूपातील स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह भव्य मानवी रांगोळीच्या माध्यमातून साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा परीक्षक राजेंद्र गाडेकर यांच्यासह विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छतामित्र उपस्थित होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा परमो धर्म’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत विविध सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छता, महिलांचे आरोग्य, आदिवासी बांधवांसाठीच्या योजना, नशामुक्ती जनजागृती यांसह विविध विषयांवर जनसहभागातून उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या वेळी महापौर सुजाता पाटील यांनी नवी मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवून देशाच्या विकासासाठी कार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.