

डॉ. हेमलता बागलांकडे एसएनडीटीच्या
कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार
मुंबई, ता. १७ ः एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांचा नुकताच कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचे आदेश कुलपतींनी आज दिले आहेत. या आदेशानुसार डॉ. बागला यांच्याकडे केवळ नियमित प्रशासकीय कामकाज इतकेच मर्यादित अधिकार असतील. यात त्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय, नवीन पदभरती, नवीन बांधकाम आदी कामे यावर कोणतेही अधिकारी नसतील, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याची माहिती आज लोकभवनकडून देण्यात आली.
राज्यातील सरकारी अनुदानित विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या कार्यकाळानंतर संबंधित विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार हा इतर अनुदानित विद्यापीठाच्या कुलकुरूंकडे सोपविला जातो. आत्तापर्यंत राज्यात तो पायंडा असताना कुलपती तथा राज्यपाल कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी एका आदेशाने राज्यात पहिल्यांदाच एसएनडीटी या अनुदानित विद्यापीठाच्या कुलगुरूंचा अतिरिक्त कार्यभार हा मुंबईतील अल्पसंख्याक आणि खासगी क्लस्टर विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, मात्र हा कार्यभार केवळ तात्पुरता पर्याय म्हणून सोपविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. अल्पसंख्याक दर्जाचे सुरुवातीला तीन आणि आता पाच अशा आठ महाविद्यालयांचे खासगी क्लस्टर विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा कार्यभार अत्यंत कमी असून, या विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अनुदानित विद्यापीठाच्या कुलगुरूंप्रमाणे कोणत्याही जाचक अटी आणि समिती आदी प्रक्रिया फार विचारात घेतल्या जात नाहीत. त्यातच अनुदानित विद्यापीठाच्या कुलगुरूंसाठी विविध प्रकारच्या अटी आणि साधारणपणे अध्यापन, प्रोफेसर आदी असणे बंधनकारक असते. अशा स्थितीत कुलपतींनी राज्यातील कोणत्याही अनुदानित विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे एसएनडीटीचा कार्यभार देणे उचित ठरले असते, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उमटल्या आहेत.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.