लोखंडी कॉइल्स वाहतूक करणारा ट्रेलर खोल दरीत कोसळून अपघात भीषण

लोखंडी कॉइल्स वाहतूक करणारा ट्रेलर खोल दरीत कोसळून अपघात भीषण
Published on

ट्रेलर खोल दरीत कोसळून अपघात भीषण
दोघे जण जखमी; पाच तास रेस्क्यू ऑपरेशनला यश
रोहा, ता. १८ (बातमीदार) ः लोखंडी कॉइल्स घेऊन जाणाऱ्या एका ट्रेलरला सुतारवाडी मार्गावरील पहूर फाटा ते वाळंजवाडीदरम्यान अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रेलर सुमारे २५० फूट खोल दरीत कोसळून एका झाडावर अडकला. तब्बल पाच तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर चालकाची सुटका करण्यात यश आले.
माणगाव तालुक्यातील विले भागाड एमआयडीसीतील ट्रेलर बुधवारी (ता. १६) हजारो टन वजनाचे तीन लोखंडी कॉइल्स घेऊन जात होता. हा ट्रेलर पहूर फाट्याजवळील घातक वळणावर आला असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि थेट खोल दरीत २५० फूट खाली कोसळून एका झाडावर अडकला. गाडी दरीत कोसळत असताना वाहकाने उडी मारल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली, मात्र चालक गंभीर अवस्थेत ट्रेलरमध्येच अडकून पडला होता. याची माहिती समजताच पोलिस व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.
आव्हानात्मक परिस्थितीत चालकाला बाहेर काढण्यासाठी नियोजनबद्ध आणि जोखमीचे बचाव मोहिम हाती घेण्यात आली. ट्रेलर त्याच ठिकाणी सुरक्षितपणे स्थिर करून चालकाची सुटका करणे हे मोठे आव्हान होते, परंतु प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीची पाहणी, सुरक्षा व्यवस्थेची खात्री आणि आवश्यक तपासणी करून ऑपरेशन पुढे नेण्यात आले. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाची सुरक्षितपणे सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले. कोलाड भागातील एसव्हीआरएसएस बचाव पथक, येरुणकर क्रेन सेंटर, कोलाड पोलिस प्रशासन यांनी परस्पर समन्वय साधत ही मोहीम फत्ते केली.

फोटो कॅप्शन : जीवाची बाजी लावून अपघातात गंभीर जखमी झालेल्या ट्रेलरचालक व वाहकाचा जीव वाचविण्यात यश आलेली रेस्क्यू टीम, क्रेनचालक व पोलिस प्रशासन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com