

सकाळ वृत्तसेवा
ठाणे/कळवा, ता. १८ : खारेगाव येथील सहयोग सोसायटीच्या मागे, खारेगाव पुलाजवळ तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या पाच झोपड्यांना आज (ता. १८) सकाळी भीषण आग लागली. या आगीत एका मिनी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. आग लागली, तेव्हा सर्व झोपड्या बंद असल्याने जीवितहानी टळली. त्या झोपड्यांमधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
खारेगाव परिसरात झोपड्यांना आग लागल्याची माहिती शुक्रवारी (ता. १८) सकाळी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. काही वेळातच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, कळवा पोलिस आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जवाहरबाग अग्निशमन दलाच्या जवानांनी एका अग्निशमन वाहनासह दोन रेस्क्यू वाहनांच्या मदतीने तातडीने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आगीची तीव्रता वाढत असताना स्थानिकांनीही आग नियंत्रणात आणण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनंतर अखेर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. या दुर्घटनेत पाचही झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे समजू शकले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.