

अधिक अचूक व अद्ययावत मतदार यादीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून उपक्रम
जव्हार, ता. १८ (बातमीदार) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विक्रमगड मतदारसंघातील मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यासोबतच, पत्ता व इतर तपशीलांतील त्रुटी दूर संधी उपलब्ध करून देण्यात आहे. त्यासाठी मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व्हावी म्हणून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. यासाठी मतदारसंघातील सर्व मतदारांसाठी १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी दिली. पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांची नोंदणी करणे आणि विद्यमान नोंदींमधील त्रुटी दूर करणे, हा या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.
अर्ज करण्याची ऑनलाइन, ऑफलाइन सुविधा
मतदार यादी तपासण्यासाठी आणि आवश्यक अर्ज ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना आपल्या नावाची पडताळणी करता येणार आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांच्याकडेही आवश्यक अर्ज सादर करता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.