

मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : मुरबाड विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून तब्बल एक लाख ३४ हजार ४०६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २७.३२ टक्के आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात मतदार यादीचे पुनरीक्षण करण्यापूर्वी चार लाख ९१ हजार ९८० मतदारांची नोंद होती. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत तीन लाख ५७ हजार ५७४ मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्टला मुरबाड विधानसभा मतदारसंघाची विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत नवी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघात तीन लाख ५७ हजार ५७४ मतदारांचा समावेश करण्यात आला असून, जुन्या यादीतील एक लाख ३४ हजार ४०६ मतदारांची नावे वेगवेगळ्या कारणांमुळे वगळण्यात आली आहेत.
नव्याने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार मुरबाड विधानसभा मतदारसंघातील पुरुष मतदारांची संख्या एक लाख ८३ हजार २६२, स्री मतदारांची संख्या एक लाख ७४ हजार ३०५ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या अवघी सात आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात मुरबाड नगर पंचायत, कुळगाव-बदलापूर नगर परिषद, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांच्या ग्रामीण भागाचा समावेश आहे. मतदार यादीतून नावे वगळण्यात आलेल्या मतदारांच्या दावे व हरकती नोंदवण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील एकूण ६६ हजार ११३ मतदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यापैकी ३३ हजार ५८५ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही तर ३२ हजार ५२८ मतदारांच्या नावांमध्ये तफावत आढळली आहे. या सुनावणीसाठी २१ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. बदलापूरमध्ये ११, अंबरनाथ २, कल्याण २, मुरबाड शहर एक व मुरबाड ग्रामीणमध्ये ५ ठिकाणी सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.