

जिल्हा परिषदेची व्यापारी संकुले दोन वर्षांपासून धूळखात पडून
रिकामे गाळे बनले मद्यपींचा अड्डा आणि कचराकुंडी.
मोखाडा, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील मोखाडा व खोडाळा बाजारपेठेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली सुमारे ७० व्यापारी संकुले अद्याप वापराविना धूळखात पडून आहेत. तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून यातील गाळे वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने हे गाळे मद्यपींचा अड्डा आणि कचराकुंडीचे ठिकाण बनले आहेत. मोखाडा येथे सुमारे ६० तर खोडाळा येथे १० व्यापारी गाळ्यांचे बांधकाम जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. शासनाचा मोठा निधी खर्च करून उभारलेली ही मालमत्ता दोन वर्षांहून अधिक काळ वापराविना पडून आहे. त्यामुळे या गाळ्यांभोवती मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. मद्यपींना मद्यपानासाठी सुरक्षित ठिकाण बनले आहे. व्यापारी गाळे सुरू झाले असते तर स्थानिक व्यावसायिकांना व्यवसायाची संधी मिळण्यासोबतच जिल्हा परिषदेलाही नियमित उत्पन्न मिळाले असते. मात्र, त्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केले आहे.
बॉक्स
गाळे वाटप कधी होणार?
व्यापारी संकुलातील गाळ्यांसाठी अनेक इच्छुक प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पात्रता तपासून गरजू व स्थानिक इच्छुकांना पारदर्शक पद्धतीने गाळ्यांचे वाटप करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या निर्णयाअभावी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अशीच पडून ठेवण्याचे कारण काय, असा सवाल नागरिकांकडून आता उपस्थित केला आहे.
कोट
संकुलांचे टेंडर व्हायचे बाकी आहे. टेंडरची प्रक्रिया पूर्ण होताच हे गाळे पारदर्शक व निकषाप्रमाणे वाटप केले जातील.
- अजय गायकवाड,
उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, मोखाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.