

भगवान श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाचा मुंबईत सोहळा
मुंबईतील १८ महानुभाव पंथीय संस्था एकाच व्यासपीठावर
मुंबई, ता. १८ : भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ऐतिहासिक सोहळा पार पडला. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या समन्वयाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आमदार व माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी धर्मसभेत उपस्थित संत-महंत आणि विद्वानांनी श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. या वेळी मंत्रालय परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य आचार्यप्रवर महंत श्री कारंजेकर बाबा (अमरावती) यांनी पंथाच्या विकासासाठी आणि शासनस्तरावर निधी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला. सोहळ्यास आमदार गोकुळ गीते, आमदार नंदकिशोर महाजन, प्रकाश नन्नावरे, नरोत्तम शेंडे, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई व मुंबई उपनगर महानुभाव परिषदेचे प्रभारी आबाजी काळे यांनी मुंबईत महानुभाव समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक व संघटनात्मक उपक्रमांसाठी स्वतंत्र ‘महानुभाव सदन’ उभारण्याची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.