

सिरोंच्यात तेलंगणाच्या विजेचा प्रकाश पडणार
महापारेषणकडून ३२ किमीच्या वीजवाहिनीचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील घरांमध्ये तेलंगणाच्या विजेचा प्रकाश पडणार आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम असलेल्या या भागाला महावितरणकडून आलापल्ली येथील वीज उपकेंद्रातून ९३ किमी लांबीच्या ६६ केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र घनदाट जंगल, नद्या-नाल्यांमधून ही वाहिनी जात असल्याने पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होतो. अनेकदा परिसराचा संपर्क तुटत असल्याने मोबाइल नेटवर्क नसल्याने बिघाड शोधणे आणि दुरुस्ती करणे अत्यंत जिकिरीचे ठरते. त्यामुळे या परिसराला अखंडित वीजपुरवठा व्हावा म्हणून तेलंगणातून पर्यायी व्यवस्था उभारण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे.
गडचिरोलीपासून २५० किमी अंतरावर असलेला सिरोंचा तालुका भौगोलिकदृष्ट्या अतिदुर्गम आहे. पूर्वेला छत्तीसगड आणि दक्षिणेला तेलंगणा सीमा आहे. येथे महावितरणचे १३ हजार ९२८ ग्राहक असून, त्यांना आलापल्ली येथील १३२/६६ केव्ही उपकेंद्रातून ९३ किमी लांबीच्या ६६ केव्ही वाहिनीद्वारे वीज पुरवली जाते. ही वाहिनी जीमलगट्टाच्या घनदाट जंगल, नद्या-नाल्यांमधून जाते. त्यामुळे पावसाळ्यात अनेकदा वीजवाहिनीत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होतो. त्याचवेळी पावसामुळे अनेक ठिकाणांचा संपर्क तुटतो, मोबाइल नेटवर्क नसते. त्यामुळे बिघाड शोधणे आणि दुरुस्ती करणे अत्यंत जिकिरीचे ठरते. यावर उपाय म्हणून सिरोंचापासून केवळ ३२ किमीवर असलेल्या तेलंगणातील किस्तमपेठ (जि. मंचेरियल) येथून सिरोंचापर्यंत ११३ टॉवर उभारून १३२ केव्ही अत्युच्च दाब वाहिनीचे काम महापारेषणकडून सुरू करण्यात येत असून, ते जानेवारी २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
१४० गावांतील नागरिकांना दिलासा
सिरोंचा येथील उपकेंद्राची १३२/६६/३३ केव्ही क्षमतावाढ पूर्ण झाली आहे. महावितरणचे नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले असून, तेथे ५ एमव्हीएचे दोन ट्रान्स्फॉर्मर आहेत. तिसरा बसवण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुहेरी जोडणीमुळे सिरोंचाला दोन्ही बाजूंनी वीज मिळणार असून, १४० गावांतील नागरिकांना दिलासा मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.