सामूहिक अत्याचार प्रकरणी पीडितेला संरक्षण देण्याची कांचन कुलकर्णी यांची मागणी

सामूहिक अत्याचार प्रकरणी पीडितेला संरक्षण देण्याची कांचन कुलकर्णी यांची मागणी
Published on

सामूहिक अत्याचारप्रकरणी
पीडितेला संरक्षण द्यावे!
कॉँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांची मागणी

कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील सामूहिक अत्याचाराच्या आरोपाच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील पीडित महिलेला मदत करणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेविका तथा गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी पीडितेच्या जीवाला दोन्ही आरोपींकडून धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. पीडितेला तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आज केली आहे.
पीडितेने १६ सप्टेंबर रोजी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तिला सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात कुलकर्णी यांनी आणखी एक दावा केला आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून कथित अत्याचार झाल्याचे सांगत तीन महिलांनी, तर बडतर्फ पोलिस अधिकारी शैलेश पाटील यांच्याकडून कथित अत्याचार झाल्याचे सांगत १५ महिलांनी आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती त्यांनी दिली.
२२ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलिस ठाण्यात सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पतीसोबतच्या वादात मध्यस्थी करण्याच्या बहाण्याने महिलेला बापगाव येथील खासगी ठिकाणी नेऊन शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, आणखी काही महिला तक्रार करण्यास इच्छुक आहेत; मात्र भीतीमुळे त्या सध्या पुढे येत नाहीत. संबंधित महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देऊन त्यांच्या तक्रारींची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com