

प्रत्यक्ष करसंकलनात १३ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली, ता. १८ ः आगाऊ कराच्या वाढीव संकलनामुळे चालू आर्थिक वर्षाच्या १७ सप्टेंबरपर्यंत सरकारचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १३ टक्क्यांनी वाढून १२.१२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. व्यावसायिक कराचे संकलन १९.४८ टक्क्यांनी वाढून सुमारे ५.५६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, तर बिगर व्यावसायिक कराचे (व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब) संकलन सहा टक्क्यांनी वाढून ६.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. १ एप्रिल ते १७ सप्टेंबर दरम्यान सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन्स टॅक्स (एसटीटी) संकलन ५३ टक्क्यांनी वाढून ४०,२१४ कोटी रुपयांवर पोहोचले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आज ही आकडेवारी जाहीर केली.
१७ सप्टेंबरपर्यंत परतावा (रिफंड) देण्याचे प्रमाण २९.१९ टक्क्यांनी वाढून २.२० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. एकूण प्रत्यक्ष करसंकलनात १५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, ते १४.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर १७ सप्टेंबरपर्यंत आगाऊ करसंकलन १६.१८ टक्क्यांनी वाढून सुमारे ५.२२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामध्ये आगाऊ व्यावसायिक कर भरण्यात १८ टक्क्यांची वाढ होऊन ते ४.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, आणि बिगर व्यावसायिक आगाऊ कर भरण्यात ९.२४ टक्क्यांची वाढ होऊन ते १.०६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.