

‘एनएसई’च्या आयपीओला १.१५ पट बोली
गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद
मुंबई, ता. १८ : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’च्या २२,५६९ कोटी रुपयांच्या आयपीओला आज दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस १.१५ पट प्रतिसाद मिळाला; यात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या ८.८६ कोटी शेअरच्या तुलनेत १०.१५ कोटी शेअरसाठी बोली लागली.
छोट्या गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या ४.४१ कोटी शेअरच्या तुलनेत या श्रेणीतील हिस्सा ०.७१ पट भरला गेला. बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या राखीव हिश्शासाठी १.६४ पट, तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या राखीव हिश्शासाठी १.५३ पट बोली लागले. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (क्यूआयबी) आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या प्रचंड प्रतिसादामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत या आयपीओसाठी शंभर टक्के बोली लागली होती. या आयपीओला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
एनएसईने बुधवारी (ता. १६) अँकर गुंतवणूकदारांकडून ६,७४६ कोटी रुपये उभारले. यात भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), गोल्डमन सॅक्स आणि फिडेलिटी यांचा समावेश आहे. जीआयसी सिंगापूर, अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए), नॉर्वेजियन बँक, ईस्टस्प्रिंग आणि एचएसबीसी ग्लोबल ॲसेट मॅनेजमेंट यांनीही अँकर गुंतवणूकदार म्हणून सहभाग घेतला.
या आयपीओमध्ये विद्यमान भागधारकांकडून १२.६४ कोटीपर्यंत शेअरची ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस) करण्यात येत आहे. आयपीओसाठी १,७०० ते १,७८५ रुपये प्रति शेअर असा भावपट्टा निश्चित करण्यात आला आहे. उच्चांकी भावानुसार एनएसईचे मूल्यांकन सुमारे ४.४२ लाख कोटी रुपये होईल. हा आयपीओ २१ सप्टेंबरला बंद होणार असून, ‘एनएसई’च्या शेअरचे बाजारात २४ सप्टेंबरला पदार्पण अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.