

ठाण्यात दोन चाळींवर
झाड कोसळले; महिला जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाण्यातील बाळकुम स्मशानभूमीजवळील पाडा क्रमांक १ येथे शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी दोन चाळींमधील चार खोल्यांवर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सरिता प्रजापती (२४) या किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. छताचे पत्रे फुटल्याने येथील आणखी दोन खोल्या धोकादायक झाल्या असून, त्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी ही घटना घडली असून, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान फायर वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी युटिलिटी वाहनासह आणि वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पडलेल्या झाडाचा शक्य तितका भाग कापून बाजूला केला, मात्र अंधार आणि जागेची अडचण असल्याने उर्वरित झाड शनिवारी सकाळी हटविण्यात येणार आहे.
टी. एम. पाटील चाळीतील मिलन शेट्टी यांच्या खोलीवरील पत्रे फुटली असून, उर्वरित पत्रे धोकादायक असल्याने खोली रिकामी करण्यात आली. संदीप प्रजापती यांच्या खोलीच्या खिडकीची काच फुटली. कोटकर हाउस चाळीतील राजकुमार प्रजापती यांच्या खोलीच्या छताचे पत्रे मोठ्या प्रमाणात फुटल्याने ती खोलीही रिकामी करण्यात आली. सुरेखा कोटकर यांच्या खोलीचे पत्रे फुटून किरकोळ नुकसान झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.