गणेशमूर्तींचे ‘ते’ फोटो काढाल तर कारवाई!

गणेशमूर्तींचे ‘ते’ फोटो काढाल तर कारवाई!
Published on

गणेशमूर्तींचे फोटो काढल्यास कारवाई!
विसर्जनानंतर पाण्यात विरघळलेल्या मूर्तींच्या छायाचित्रणास पोलिसांची मनाई

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या किंवा अर्धवट विरघळलेल्या मूर्तींचे फोटो काढण्यास ठाणे पोलिसांनी मनाई केली आहे. तसेच अशा मूर्तींची छायाचित्रे किंवा व्हिडिओ सोशल मीडिया, वृत्तमाध्यमे अथवा अन्य सार्वजनिक माध्यमांवर प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. हा आदेश १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे. विसर्जनानंतर काही गणेशमूर्ती पूर्णपणे विरघळत नसल्याने त्या पाण्यावर तरंगताना किंवा किनाऱ्यावर वाहून आलेल्या अवस्थेत दिसतात. महापालिका कर्मचारी अशा मूर्ती गोळा करीत असतानाचे फोटोही काढले जातात. या छायाचित्रांचा गैरवापर होऊन धार्मिक भावना दुखावण्याची तसेच सार्वजनिक शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता पोलिसांनी आदेशात व्यक्त केली आहे. या आदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी आदेशाच्या प्रती लावणे, वृत्तपत्रांतून प्रसिद्धी देणे आणि ध्वनिक्षेपकाद्वारे घोषणा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com