न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप - पालिका आयुक्तांना अवमान नोटीस

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप
-  पालिका आयुक्तांना अवमान नोटीस
Published on

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप

खाडीत पीओपी मूर्तींचे विसर्जन; पालिका आयुक्तांना अवमान नोटीस

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक असतानाही ठाणे खाडीच्या नैसर्गिक पात्रात पीओपी मूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जनहित याचिकाकर्ते व पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी ठाणे महापालिकेसह संबंधित महापालिका आयुक्त, राज्याच्या पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अवमान नोटीस बजावली आहे.

जोशी यांनी त्यांच्या वकील ॲड. रोनिता भट्टाचार्य बेक्टर यांच्यामार्फत ही नोटीस बजावली आहे. पारसिक रेतीबंदर, कोपरी रेतीबंदर, महागिरी कोळीवाडा आणि कोलशेत खाडी परिसरात घरगुती तसेच लहान पीओपी मूर्तींचे थेट खाडीत विसर्जन झाल्याचा दावा नोटिसीत करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी दिलेल्या आदेशातील निर्देश १४ व २० ऑगस्ट २०२६च्या आदेशांतही कायम ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात करण्याचे निर्देश आहेत. सहा फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींना नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनाची सशर्त परवानगी देण्यात आली असून, विसर्जनानंतर २४ तासांच्या आत मूर्तींचे अवशेष व अन्य साहित्य बाहेर काढण्याची हमी राज्य शासनाने न्यायालयात दिल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. १५ सप्टेंबरला विसर्जित केलेल्या मूर्ती १७ व १८ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच ४८ ते ७२ तासांनंतरही खाडीत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाणे खाडीला रामसर दर्जा असून येथील जैवविविधता आणि रोहित पक्ष्यांच्या अधिवासावर याचा परिणाम होण्याची शक्यता जोशी यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये पोलिसांसह, पालिका अधिकाऱ्यांसमोरच ठाणे खाडीत पीओपी मूर्तींचे विसर्जन सुरू असल्याने या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी जोशी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com