विजेचा धक्का बसून तरुणीचा मृत्यू

विजेचा धक्का बसून तरुणीचा मृत्यू
Published on

विजेचा धक्का बसून तरुणीचा मृत्यू

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : गणपती दर्शनासाठी नातेवाइकाकडे जात असलेल्या २६ वर्षीय तरुणीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी उभारलेल्या खांबाच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. करिष्मा मधवाणी असे मृत तरुणीचे नाव असून, ती गणेशगंगा अपार्टमेंटमध्ये राहत होती. ही घटना शुक्रवारी (ता. १८) रात्री कॅम्प क्रमांक तीनमध्ये घडली.

करिष्मा घरातून बाहेर पडल्यानंतर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचली. त्या वेळी खांबाच्या संपर्कात येताच तिला विजेचा तीव्र धक्का बसला. ती जागीच कोसळली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या करिष्माचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, खांबामध्ये विद्युत प्रवाह कसा उतरला, तसेच सीसीटीव्हीचे काम सुरू असताना आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तांत्रिक बाबींसह संबंधितांची चौकशी सुरू केली आहे. तपासानंतर दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com