‘अप नेक्स्ट’मध्ये समकालीन कलेचे विविध प्रयोग

‘अप नेक्स्ट’मध्ये समकालीन कलेचे विविध प्रयोग
Published on

मुंबई, ता. २० : चित्रकला, शाईचित्र, मिश्र माध्यम, टेक्स्टाइल आणि इन्स्टॉलेशन अशा विविध माध्यमांतील कलाकृती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी ‘अप नेक्स्ट-अ न्यू वेव्ह ऑफ कंटेम्पररी आर्ट’ या समूह प्रदर्शनातून मिळणार आहे. रितू चोप्रा आणि विकास सिंह यांच्या क्युरेशनमधून साकारलेले हे प्रदर्शन २२ ते २८ सप्टेंबरदरम्यान वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत भरवण्यात येणार आहे. भारत आणि परदेशातील १५ कलाकारांच्या सुमारे ४५ ते ५० कलाकृतींचा यात समावेश आहे.

या प्रदर्शनात अमूर्त चित्रांपासून ध्यानात्मक शाईचित्रांपर्यंत, मिश्र माध्यम आणि इम्पास्टो शैलीतील कामांपासून आधुनिक भक्तीपर कलाकृती आणि मोठ्या आकाराच्या इन्स्टॉलेशन्सपर्यंत विविध प्रकार पाहायला मिळणार आहेत. सहभागी भारतीय कलाकार गुरुग्राम, गुवाहाटी, छत्रपती संभाजीनगर, बडोदा, बंगळूर, मुंबई आणि पुणे येथील आहेत. नॉर्वे, रशिया आणि अमेरिकेतील कलाकारांचाही यात सहभाग आहे. प्रदर्शनातील लक्षवेधी कामांपैकी एक कलाकृती १०८ स्वतंत्र कॅनव्हास एकत्र मांडून तयार केली जाणार आहे. या प्रदर्शनात मीना यादव, रिता छावछरिया, पूजा शर्मा, राखी शाह, तिथी आरेकर, भावना मधानी, निधी चरण, अमिता गोस्वामी, कल्पेश चव्हाण, रचना कारिया, श्वेता भदानी मोदी, कैलास काळे, चीना मदान, राखी बैद आणि ओल्गा विकोनिना सहभागी होत आहेत. समकालीन कलेतील विविध माध्यमे, शैली आणि कलाकारांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा एकत्रित अनुभव या प्रदर्शनातून घेता येणार आहे. ‘अप नेक्स्ट’ हे प्रदर्शन २२ ते २८ सप्टेंबरदरम्यान नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी येथे पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com