‘बाप्पा.ओआरजी’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

‘बाप्पा.ओआरजी’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
Published on

विरार, ता. २० (बातमीदार) : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिला आहे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला जागतिक स्तरावर नेणे, तसेच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला ‘युनेस्को’चा वारसा दर्जा व यासंदर्भातील अन्य जागतिक मानांकने प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सामाजिक बांधिलकी, विविध कला-कौशल्ये, धार्मिक व सांस्कृतिक वारसा तसेच पर्यावरणपूरक उपक्रम यांची माहिती जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पुरातत्त्व संचालनालयामार्फत Bappa.org हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गणेशभक्त, नागरिक, सामाजिक संस्था तसेच गणेशोत्सवाशी संबंधित विविध घटकांनी Bappa.org या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

या अधिकृत मंचावर गणेशोत्सवासाठी संबंधित घरगुती व सार्वजनिक परंपरा, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, हस्तकला, चालीरीती, कला सादरीकरण, खाद्य परंपरा, आठवणी, सांस्कृतिक उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ नागरिकांनी Bappa.org वर अपलोड करून आपला सहभाग नोंदवावा. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com