कर्तव्याच्या धावपळीतही गणरायाची आराधना

कर्तव्याच्या धावपळीतही गणरायाची आराधना
Published on

कल्याण, ता. २० (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या काळात शहराची कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पार पाडतानाच कल्याण परिमंडळ-३चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आपल्या कुटुंबासोबत पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. कर्तव्यस्थळीच गणेशमूर्तीची स्थापना करून ते कुटुंबीयांसह बाप्पाची आराधना करत आहेत.
झेंडे यांच्यासाठी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून बालपणीच्या आठवणी, कौटुंबिक संस्कार आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सोहळा आहे. पुण्यात बालपणी सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळाचे सदस्य म्हणून सहभागी होत त्यांनी उत्सवाचा अनुभव घेतला. आता मात्र खाकी वर्दीतील जबाबदारीमुळे उत्सवाकडे पाहण्याची त्यांची भूमिका बदलली आहे. बालपणी कुटुंबासोबत साजरा केलेल्या गणेशोत्सवाच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. मोदकाचा सुगंध, आरतीचे स्वर आणि घरातील ज्येष्ठांकडून ऐकलेल्या गणपतीच्या कथा यामुळे संस्कार मनावर बिंबले. हेच संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी दरवर्षी घरी गणपतीची स्थापना करतो, असे झेंडे यांनी सांगितले. झेंडे आता पोलिस अधिकारी म्हणून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत कायदा-सुव्यवस्थेबाबत बैठका घेतात. मिरवणुका, गर्दीचे नियोजन आणि अन्य बाबींवर आवश्यक मार्गदर्शनही करतात. दिवसभराच्या कामाचा कितीही ताण असला, तरी गणरायासमोर काही क्षण हात जोडून उभे राहिल्यानंतर मनाला वेगळीच शांतता मिळते. गणरायाच्या चरणी मिळणारे आत्मिक समाधान वेगळेच आहे, असे झेंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com