फिरत्या विसर्जनाला ठाणेकरांची पाठ

फिरत्या विसर्जनाला ठाणेकरांची पाठ
Published on

ठाणे, ता. २० (बातमीदार) : गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद आणि नाचत-गाजत मिरवणूक काढत गणरायाला निरोप देण्याचा आनंद ठाणेकरांनी सहाव्या दिवशीही लुटला, मात्र गौरीसह गणेशाला निरोप देताना ठाणेकरांनी फिरती विसर्जन व्यवस्था आणि मूर्ती स्वीकृती केंद्रांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या दोन्ही पर्यायी व्यवस्थांमधून केवळ १८२ गणपतींचे विसर्जन झाले.

गौरी-गणपती विसर्जनाच्या सहाव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १६ हजार ५३ गणपती आणि एक हजार ३९ गौरींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये १० हजार २०७ गणपतींचे कृत्रिम तलावांत, तीन हजार ७२६ मूर्तींचे टँकद्वारे, तर एक हजार ९३८ मूर्तींचे खाडी घाटावर विसर्जन झाले. गणपतींसोबतच शहरातील विविध प्रभाग समित्यांमध्ये एक हजार ३९ गौरींचे विसर्जन करण्यात आले.

नागरिकांना घराजवळच विसर्जनाची सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने मूर्ती स्वीकृती केंद्र आणि फिरती विसर्जन व्यवस्था उपलब्ध केली होती, मात्र मूर्ती स्वीकृती केंद्रात केवळ १५८ मूर्ती स्वीकारण्यात आल्या. फिरत्या विसर्जन व्यवस्थेद्वारे अवघ्या २४ गणपतींचे विसर्जन झाले. त्यामुळे या दोन्ही सुविधांचा मिळून केवळ १८२ मूर्तींसाठी वापर झाला. ठाणेकरांनी विसर्जनासाठी घाट आणि कृत्रिम तलावांनाच पसंती दिल्याचे दिसून आले.

माजिवडा-मानपाड्यात सर्वाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन
माजिवडा-मानपाडा ३,७५८
नौपाडा-कौपरी २, ८०९
वागळे २,७४९
कळवा २,४९१
वर्तकनगर २,२२७
उथळसर ६१२
दिवा ८२९
मुंब्रा ३४८
लोकमान्य-सावरकर २३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com