नवी मुंबईत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरूच

नवी मुंबईत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरूच
Published on

नवी मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरूच
फेरीवाले, भाजीविक्रेते आणि किरकोळ दुकानदारांकडून वापर
वाशी, ता. २० (बातमीदार) ः पालिका क्षेत्रात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पुन्हा सर्रासपणे सुरू झाल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे. शहरात विशेषतः फेरीवाले, भाजीविक्रेते, स्वीट मार्ट तसेच किरकोळ दुकानदारांकडून ग्राहकांना उघडपणे प्लॅस्टिक पिशव्यांमधून वस्तू दिल्या जात आहेत. काही वर्षांपूर्वी पालिकेच्या कडक कारवाईमुळे रस्त्यांवरून गायब झालेले प्लॅस्टिक पुन्हा सर्वत्र दिसू आहेत. यामुळे महापालिकेच्या प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीवर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.
राज्य सरकारने मे २०१८ मध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर शहरात प्लॅस्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून नियमित कारवाई करण्यात आली. प्लॅस्टिक पिशव्या साठविणाऱ्या तसेच त्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही काळ या कारवाईमुळे प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसून आले होते, मात्र आता पुन्हा प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढताना दिसत आहे. नवी मुंबईतील विविध भागांतील भाजी मंडई, फेरीवाले, किराणा दुकाने तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.

पर्यावरणाला अपायकारक
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केल्यानंतर त्या थेट कचऱ्यात जात असल्याने शहरातील कचरा व्यवस्थापनासह पर्यावरणाच्या दृष्टीनेही समस्या निर्माण होत आहे. नाल्यांमध्ये प्लॅस्टिक साचल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नियमित कारवआ सुरू
महापालिकेचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी सांगितले की, प्लॅस्टिक पिशव्या साठविणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेकडून नियमित कारवाई करण्यात येते. नागरिकांनीही दुकानदारांकडून प्लॅस्टिक पिशव्या घेणे टाळावे. त्याऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, यासाठी महापालिकेकडून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com