घाटकोपरमध्ये रागाने पाहिले म्हणून एकाची हत्या, एक जखमी

घाटकोपरमध्ये रागाने पाहिले म्हणून एकाची हत्या, एक जखमी
Published on

रागाने पाहिले म्हणून एकाची हत्या
घाटकोपरमधील घटनेत एक जखमी; सात अटकेत
घाटकोपर, ता. २० (बातमीदार) ः आपल्याकडे रागाने पाहिले म्हणून घाटकोपरच्या कामराजनगर येथे एकाची हत्या करून दुसऱ्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांना येत्या गुरुवारपर्यंत (ता. २४) पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी रौनक बाळू सोनवणे, आकाश सुभाष सोनवणे, अश्विन गणेश उनवणे, श्रेयस अजय शुक्ला, बबलू आणि स्टीफन सेगल नाडर उर्फ अण्णा अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी दीप्ती राजू पिल्लई आणि आरोपी हे कामराजनगर येथे राहतात. ही घटना कामराजनगर येथील एका गणपती मंडळासमोर घडली. यातील मृताचे नाव राजेश राजेंद्रन देवेंदर असे आहे. सेवेन स्टार स्पोर्ट्‌स क्लब मंडळाचा कार्यकर्ता विनय शर्माने आरोपी रौनक बाळू सोनवणेकडे रागाने बघितल्याचा गैरसमज झाल्याने रौनक सोनवणे याने विनयच्या कानाखाली चापट मारली. त्यानंतर त्याचा जाब विचारण्याकरिता राजेश देवेंद्रन (सेवन स्टार स्पोर्ट्‌स मंडळाचे अध्यक्ष) हे गेले असता आरोपींनी राजेशच्या छातीत चाकू खूपसून त्याची हत्या केली. यातील साक्षीदार आनंद तिवारीच्या कमरेवर वार करून त्यालाही जखमी केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com