वाढवण बंदर तर राष्ट्रीय संकट : एनएपीएम

वाढवण बंदर तर राष्ट्रीय संकट : एनएपीएम
Published on

वाढवण बंदर तर राष्ट्रीय संकट : एनएपीएम
मच्छीमार, शेतकरी, भूमिहीन श्रमिकांशी राष्ट्रीय प्रतिनिधींचा संवाद

कासा, ता. २० (बातमीदार) : वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्स (एनएपीएम)च्या राष्ट्रीय तसेच विविध राज्यांतील प्रतिनिधींनी १९ व २० सप्टेंबर रोजी वाढवण परिसरातील मच्छीमार, आदिवासी शेतकरी, डायमेकर्स, भूमिहीन श्रमिक आणि अन्य प्रभावित समुदायांशी संवाद साधला.
वाढवण बंदरविरोधातील स्थानिकांच्या संघर्षात एनएपीएम सुरुवातीपासून सहभागी असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. मेधा पाटकर, दिवंगत थॉमस कोचरी, रामभाऊ पाटील, एन. डी. कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या लढ्याला साथ दिल्याचे त्यांनी नमूद केले. प्रकल्पाचा आकार टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आल्याने त्याच्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आढावा घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
--------
‘आम्हाला तिसरी मुंबई नको’
जेएनपीएसह देशातील अन्य बंदरांच्या अनुभवांचा अभ्यास करून वाहतूक, शहरीकरण, प्रदूषण, मासेमारी आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराचे परिणाम तपासावेत, अशी मागणी करण्यात आली. ‘‘आम्हाला तिसरी मुंबई नको; आमचा समुद्र, शेती, जंगलं आणि गावं जशी आहेत तशीच टिकली पाहिजेत,’’ अशी भूमिका स्थानिकांनी मांडली. विकासाला विरोध नाही; मात्र स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली. चांगल्या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शेती-बागायती सुविधा, मच्छीमारांना योग्य बाजारभाव व स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची मागणी करण्यात आली.
--------
स्थानिकांच्या लढ्याला पाठिंबा
एनएपीएमचे राष्ट्रीय समन्वयक संजय मंगला गोपाल आणि सुनीता सु. र. यांनी स्थानिकांच्या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला. प्रकल्प रद्द करावा, वृक्षतोड व पायाभूत कामांना स्थगिती द्यावी, पारंपरिक मासेमारीचे संरक्षण करावे आणि आदिवासींचे जमीन, जंगल व पेसा कायद्यानुसार हक्क अबाधित ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com