गणेशगल्लीत अवतरली पंढरी

गणेशगल्लीत अवतरली पंढरी
Published on

गणेशगल्लीत अवतरली पंढरी
‘मुंबईचा राजा’च्या ९९व्या वर्षी विठ्ठल मंदिराची भव्य प्रतिकृती

मुंबई, ता. २० : मुंबईतील गणेशोत्सवाची भव्य परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या ‘लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली’ला यंदा ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्सव परंपरेत अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या या मंडळाचे ९९वे वर्ष आहे. या १००व्या वर्षाच्या पूर्वसंध्येला गणेशगल्लीत यंदा अत्यंत भक्तिमय आणि भव्य देखाव्याची उभारणी करण्यात आली असून, संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.

यंदा गणेशगल्लीत प्रवेश करताच भाविकांना थेट श्रीक्षेत्र पंढरपूरला पोहोचल्याचा अनुभव मिळत आहे. मंडळातर्फे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची अत्यंत भव्य आणि सुबक प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यासोबतच, पुष्पक विमानाची भव्य प्रतिकृती, मंदिराचे उंच शिखर, खांबांवरील पारंपरिक कोरीव काम आणि चंद्रभागेच्या पात्राचा हुबेहूब देखावा भाविकांचे डोळे दीपवून टाकणारा आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत एकनाथ यांचा माहितीपट इथे मांडण्यात आल्याने वारकरी संप्रदायाचा गौरव गणेशगल्लीत पाहायला मिळतोय.

गणेशोत्सवाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सर्वांचे श्रद्धास्थान असलेली ‘मुंबईचा राजा’च्या गणपतीची भव्य मूर्ती. ही मूर्ती नेहमीप्रमाणेच २२ फूट उंच आणि रुबाबदार असून, यंदा मूर्ती आकर्षक कमळावर विराजमान झाली आहे. राजाचा हा मनमोहक, तेजस्वी आणि देखणा अवतार डोळ्यांत साठवण्यासाठी आणि नतमस्तक होण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची गणेशगल्लीत अलोट गर्दी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com