

वज्रेश्वरी, ता. २० (बातमीदार) : नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वनमाळी अ क्रीएटिव्ह सेवा ट्रस्ट, ठाणे ग्रामीण आणि साई होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वज्रेश्वरी येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. श्री बाळ साई एकता गणेश मंडळाच्या ठिकाणी वज्रेश्वरीच्या रौप्य महोत्सवानिमित्त तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० हून अधिक नागरिकांनी विविध आरोग्य समस्यांची तपासणी करून घेतली.
शिबिरासाठी ११ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक उपस्थित होते. नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी करण्यात आली. आवश्यक तपासण्या केल्यानंतर होमिओपॅथी उपचारपद्धतीनुसार मार्गदर्शन करण्यात आले. विविध आजारांवरील औषधांचे मोफत वाटपही करण्यात आले. शिबिरात नैसर्गिक उपचारपद्धतीचे महत्त्व, होमिओपॅथी उपचार, आरोग्यदायी जीवनशैली, योग्य आहार आणि दैनंदिन आरोग्याची काळजी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखू, गुटखा आणि मद्यपानामुळे होणाऱ्या आरोग्यावरील दुष्परिणामांची माहिती देत व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. वनमाळी अ क्रिएटिव्ह सेवा ट्रस्टचे विश्वस्त वैभव पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर झाले. शिबिरासाठी उपस्थित वैद्यकीय पथकातील डॉक्टरांचा वैशाली पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री बाळ साई एकता गणेश मंडळ, वज्रेश्वरीचे कार्यकर्ते तसेच सरपंच रमेश जाधव यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.