वडाळे तलावाला पेशवेकालीन स्थापत्यशैलीतील भव्य प्रवेशद्वाराची शान

वडाळे तलावाला पेशवेकालीन स्थापत्यशैलीतील भव्य प्रवेशद्वाराची शान
Published on

ऐतिहासिक वडाळे तलावाला पेशवेकालीन प्रवेशद्वार
महापौर नितीन पाटील यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन
पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः शहराच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या वडाळे तलावाच्या पेशवेकालीन स्थापत्यशैलीतील प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन करण्यात आले. महापौर नितीन पाटील, ज्येष्ठ नागरिक डॉ. गुणे, उपमहापौर व विविध सभापतींच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. ऐतिहासिक वास्तुकलेचा वारसा जपत आधुनिक सुविधांचा समावेश केल्यामुळे हे प्रवेशद्वार पनवेलकरांसाठी मोठे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
वडाळे तलावाला ऐतिहासिक महत्त्व असून, या परिसराचा विकास करताना त्याचे सौंदर्य आणि ऐतिहासिक ओळख जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराची रचना पेशवेकालीन स्थापत्यशैलीवर आधारित आहे. प्रवेशद्वारावरील कलात्मक कोरीव कामामुळे त्याला पारंपरिक आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वेळी माजी सभागृह येथे परेश ठाकूर, नगरसेवक सुमित झुंजारराव, नगरसेविका स्नेहल ढमाले पाटील, प्रीती जॉर्ज, रुचिता लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईने खुलणार सौंदर्य
प्रवेशद्वारावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी विशेष लक्षवेधी ठरणार आहे. प्रकाशयोजनेमुळे प्रवेशद्वारासह तलाव परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. नागरिकांना तलावाचे निसर्गरम्य दृश्य अनुभवता यावे, यासाठी व्ह्युइंग गॅलरीची सुविधाही करण्यात आली आहे. तलाव परिसरात नागरिकांना निवांत बसता यावे, यासाठी बैठक व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com