बांधकाम कचरा टाकणाऱ्या विकासकाला ५० हजारांचा दंड

बांधकाम कचरा टाकणाऱ्या विकासकाला ५० हजारांचा दंड
Published on

बांधकाम कचरा टाकणाऱ्या विकसकाला ५० हजारांचा दंड
घाटकोपरच्या गरोडियानगरातील प्रकार; पदपथ, रस्त्यावर अस्वच्छता पसरवल्याची कारवाई
घाटकोपर ता. २१ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेतील गरोडियानगर येथील भवानी व्हिजन विकसकाकडून इमारत बांधकामादरम्यान पदपथ व रस्त्यावर अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी पालिकेच्या एन विभागाने संबंधित विकसकावर शुक्रवारी (ता. १८) ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
भवानी व्हिजन विकसकाकडून इमारत बांधकामाचे काम सुरू असताना बांधकाम साहित्य, कचरा तसेच इतर घाण रस्त्याच्या व फुटपाथच्या परिसरात साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याची दखल घेत पालिकेच्या घनकचरा विभागाच्या पथकाने पाहणी करून संबंधित विकसकावर ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
उपायुक्त संतोषकुमार धोंडे आणि सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता साजिद सौदागर यांनी ही कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणे, रस्ते व फुटपाथवर कचरा टाकणे तसेच बांधकामादरम्यान परिसराची स्वच्छता न राखणाऱ्यांविरोधात पालिकेकडून नियमितपणे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ही संबंधितांची जबाबदारी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दररोज कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com