भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरफोडीसाठी रेकी

भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरफोडीसाठी रेकी
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : हातात भिक्षेची वाटी घेऊन परिसरात फिरायचे अन् घरांची पाहणी करायची. बंद घर हेरून रात्री हात साफ करायचा, अशा पद्धतीने घरफोड्या करणाऱ्या टोळीचा घटक-५ वागळे युनिटने पर्दाफाश केला आहे. तिघांना अटक करून त्यांच्याकडून १५२ ग्रॅम सोने, चार किलो १५ ग्रॅम चांदी, दोन लाख ५५ हजारांची रोकड आणि चार मोबाईल असा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रारदार आरती लालन यांच्या घरातून १५ लाख ९८ हजारांचे सोने-चांदीचे दागिने व मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा घटक-५ वागळे युनिटने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळ आणि संशयितांच्या मार्गावरील ८० ते ८५ सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची ओळख पटविण्यात आली. या तपासातून प्रदीप कमलेशकुमार गौतम (वय २५), राजकुमार ठाणाराम राजनाथ (२०) आणि दक्ष जितेंद्र मारवाडी (२०) यांना अनुक्रमे भिवंडी, सूरत आणि राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी साथीदारांच्या मदतीने ठाणे शहर परिसरात घरफोडीचे सहा गुन्हे केल्याची माहिती समोर आली.

भिक्षा मागण्यासाठी घरांच्या परिसरात फिरत आणि बंद घरांवर पाळत ठेवून संधी साधत घरफोडी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. रबाळे, नारपोली, वागळे इस्टेट आणि राबोडी पोलिस ठाण्यांतील गुन्हे या तपासातून उघडकीस आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com