व्यक्तीगत संकल्पा बरोबर पर्यावरण समृद्ध करण्यासाठी नागरीकांनी सामाजिक संकल्प करावा

व्यक्तीगत संकल्पा बरोबर पर्यावरण समृद्ध करण्यासाठी नागरीकांनी सामाजिक संकल्प करावा
Published on

व्यक्तिगत संकल्पाबरोबर पर्यावरण समृद्ध करण्यासाठी नागरिकांनी सामाजिक संकल्प करावा
भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट जयदीप पॉल यांचे प्रतिपादन
मुरुड, ता. २१ (बातमीदार) ः प्रत्येक नागरिकाने सामाजिक बांधिलकीतून वैयक्तिक संकल्पाबरोबरच पर्यावरण समृद्ध करण्यासाठी सामाजिक संकल्प करावा. समुद्रकिनारे सुंदर व स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून, अशा व्यापक जनजागृतीतूनच पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य आहे, असे प्रतिपादन भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट जयदीप पॉल यांनी केले.
भारतीय तटरक्षक दल केंद्र (मुरूड-जंजिरा), जेएसडब्ल्यू आणि इनकोईस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते स्वच्छता दूतांना मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपीठावर मुरूडचे नायब तहसीलदार कल्याण देऊळगावकर, जेएसडब्ल्यूचे कॅप्टन देवेंद्र राणे, डॉ. लक्ष्मीकांत ढगे, डॉ. बी.जी. भवरे, आयुष हॉस्पिटलचे डॉ. ऋतुज माळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक तौफिक सय्यद, प्रा. मेघराज जाधव, कमांडिंग अधिकारी चैतन्य जोगदंड आणि अभिषेक करुणाकरण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात चैतन्य जोगदंड यांनी स्वच्छ सागर, सुरक्षित किनारा या घोषणेला अनुसरून सागरी परिसंस्थेचे रक्षण करणे व किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याबाबत लोकजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. डॉ. भवरे यांनी इनकोईसच्या सागरी माहितीचे महत्त्व सांगत उपस्थितांना स्वच्छता शपथ दिली.

साडेपाच टन कचरा संकलित
या मोहिमेत तटरक्षक दलाच्या जवानांसह सर एस. ए. जुनियर कॉलेज, अंजुमन इस्लाम हायस्कूल, अंजुमन पदवी महाविद्यालय, मेरिटाइम बोर्ड, पोलिस दल, नगर परिषद कर्मचारी आणि मच्छीमार संस्थांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व स्वच्छता दूतांनी दोन तास साफसफाई करून सुमारे साडेपाच टन ओला व सुका कचरा संकलित केला. डेप्युटी कमांडंट अभिषेक करुणाकरण यांनी आभार मानताना समुद्राला डम्पिंग ग्राउंड करू नका, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com