

वज्रेश्वरीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
भातपिकाला पावसाची संजीवनी; शेतकऱ्यांना दिलासा
वज्रेश्वरी, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने आज सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाल्याने नागरिकांची काही काळ धावपळ झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसह दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. सध्या पोटरीतील भातपिकाला पावसाची गरज होती. यामुळे आज पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भातपीक पोटरीत आले असतानाच सायंकाळी भिवंडी ग्रामीण भागात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. हलवार व गरवा भातपिकाला सध्या पाण्याची गरज असताना या पावसामुळे पिकाला आवश्यक ओलावा मिळाला असून, दाणे भरण्यासाठी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पिकाच्या वाढीबाबत चिंतेत होते. मात्र पोटरीच्या निर्णायक अवस्थेतच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पिकाला योग्य वेळी पाणी मिळाल्याने भाताचे दाणे चांगले भरण्यास मदत होईल आणि उत्पादनात समाधानकारक वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. असाच पाऊस पडला तर निमगरवा व गरवा ही भातपिके चांगली येतील, अशी माहिती अंबाडी येथील सागर संकेत या कृषी सेवा केंद्राचे शेतकरी मधुकर पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.