

वसई, ता. २२ (बातमीदार) : वसई-विरार शहरात झपाट्याने वाढणारे नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या आणि सुरू असलेली विकासकामे यामुळे धूलिकणांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर खोदकाम, मातीचे ढिगारे आणि खडीचा पसारा असल्याने धुळीचे कण हवेत मिसळत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या वसई-विरार शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम स्वरूपाचा आहे. स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेसाठी हवा गुणवत्ता निर्देशांक ५० किंवा त्यापेक्षा कमी असणे अपेक्षित मानले जाते, मात्र विविध ठिकाणी हवेत मिसळणाऱ्या धूलिकणांमुळे प्रदूषणाची पातळी वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे.
महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. क्षेपणभूमीवर साचलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची योजना आखली जात असून, जलप्रदूषण रोखण्यासाठी सणासुदीच्या काळात कृत्रिम तलावांची निर्मिती केली जात आहे, मात्र हवेतील धूलिकणांचे प्रदूषण रोखण्याचे आव्हान कायम आहे.
वसई तालुक्यात वाहनांची मोठी वर्दळ असून, औद्योगिक वसाहतीही मोठ्या प्रमाणात आहेत. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, महिला आणि कामगारांना दररोज या मार्गांवरून प्रवास करावा लागतो. धूलिकण हवेत मिसळल्याने दृश्यमानता कमी होण्यासह श्वसनाशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
प्रशासनाने पुढाकार घ्यावा
शहरातील रस्त्यांवरील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित पाणीफवारणी, बांधकाम साहित्याची योग्य हाताळणी आणि खोदकामानंतर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याबाबत प्रभावी खबरदारी घेऊन नागरिकांना स्वच्छ हवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाहन चालवताना नाकीनऊ
वाहनधारकांना वाहन चालवताना धूलिकणांमुळे नाकीनऊ येत आहे. तसेच सूक्ष्म कणांमुळे डोळे चुरचुरत आहेत. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे होत आहे. धूळ असल्याने डोळ्यांना त्रास होतो. तोंडातदेखील कण जातात. त्यामुळे याबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून धूळमुक्त वसई-विरार शहरासाठी दखल घ्यावी.
- शशिभूषण शर्मा, संघटक, ठाकरे सेना, वसई
वसई : वाहनधारकांना प्रवास करताना धुळीमुळे कसरत करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.