ज्येष्ठ साहित्यिक व्यंकट पाटील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष

ज्येष्ठ साहित्यिक व्यंकट पाटील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
Published on

ज्येष्ठ साहित्यिक व्यंकट पाटील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
तिसरे ग्रामीण मराठी सांगली जिल्हा साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये
मुंबई, ता. २२ (बातमीदार) ः तिसऱ्या ग्रामीण मराठी सांगली जिल्हा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक व सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त व्यंकट पाटील यांची निवड केली आहे. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सरकार आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून मायाक्का बिरुदेव चॅरिटेबल ट्रस्ट, बिसूर (सांगली) आयोजित हे संमेलन नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आनंदा टकले यांनी ही माहिती दिली.
व्यंकट पाटील यांनी पोलिस सेवेत कार्यरत असतानाच साहित्याची नाळ घट्ट जोडून ठेवली. विविध सामाजिक अनुभव, मानवी स्वभाव, पोलिस सेवेतील वास्तव आणि समाजजीवनातील अनेक पैलू त्यांच्या साहित्यामधून प्रभावीपणे उमटले आहेत. महाराष्ट्रभर साहित्यिक म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत ‘घात’, ‘घरं हरवलेला पोलिस’, ‘वारसा’, ‘यशवंत’, ‘सर्जा’, ‘कोब्रा’, ‘मायनस वन’ या पुस्तकांचा समावेश असून ‘प्रेमतरंग’ हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या साहित्यनिर्मितीला व सामाजिक योगदानाला विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com