

विधान परिषदेच्या पाच जागांचे बिगुल
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत २३ ऑक्टोबरला मतदान
मुंबई, ता. २२ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ला मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ला संपुष्टात येणार आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी २९ सप्टेंबर २०२६ला अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे. मतदान २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल. मतमोजणी २७ ऑक्टोबर २०२६ला करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण केली जाणार आहे. राज्यातील या पाच जागांमध्ये औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून किरण सरनाईक आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर या विद्यमान सदस्यांचा समावेश आहे. या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.
शिक्षण संघटनांची धावाधाव
दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यानच या निवडणुका होणार असल्याने या निवडणुकांमध्ये कायम सक्रिय असलेल्या शिक्षण संघटनांची या काळात मोठी धावाधाव होणार आहे. काही मतदारसंघांत वर्षानुवर्षे काही उमेदवार निवडून येत असल्याने या वेळी औरंगाबाद आदी मतदारसंघात मोठी रंगत पाहावयास मिळणार आहे. यात विशेषतः खासगी शाळा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात मैदानात येणार असल्याने अनुदानित शाळांसंदर्भात सक्रिय असलेल्या संघटनांपुढे या वेळी मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.