विजय मल्याला इशारा

विजय मल्याला इशारा
Published on

न्यायालयीन कागदपत्रे
प्रसिद्ध करू नका! 
न्यायालयाचा विजय मल्ल्याला इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यासंबंधित कागदपत्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करू नका, असा इशारा उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २२) फरार आर्थिक गुन्हेगार उद्योगपती विजय मल्ल्याला दिला. 
मल्ल्याने प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे समाजमाध्यमावरून प्रसिद्ध केल्याची बाब सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयाच्या निदर्शनास आणून तीव्र आक्षेप नोंदवला. कागदपत्रांतील मजकूर न्यायालयाने विचारात घेण्यापूर्वीच मल्ल्याने आपले प्रतिज्ञापत्र ‘एक्स’वर प्रसिद्ध केल्याचे ईडीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने त्याची दखल घेऊन मल्याला न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध न करण्याचा इशारा दिला. ईडीने केलेल्या खुलाशांच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे आदेश देऊन सुनावणी १३ ऑक्टोबरला सूचीबद्ध केली.

मल्ल्याच्या बंद पडलेल्या ‘किंगफिशर एअरलाईन्स’ने बँकांच्या समूहाकडून घेतलेल्या सुमारे ९,००० कोटींच्या कर्जाबाबत त्याच्यावर भारतात कायदेशीर कारवाई सुरू आहे. मल्ल्याने मार्च २०१६ मध्ये भारतातून पलायन केले आहे. जानेवारी २०१९ मध्ये विशेष न्यायालयाने मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले. त्यामुळे फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत त्याच्या मालमत्तेची जप्ती आणि विल्हेवाट लावण्याची कारवाई करण्याचा अधिकार प्राधिकरणांना मिळाला. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कारवाईचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com