औषधांच्या गोण्यांत नशेचा साठा !

औषधांच्या गोण्यांत नशेचा साठा !
Published on

औषधांच्या गोणींत नशेचा साठा !
दहीसरमधून तीन हजार ७१५ कोडीनयुक्त कफ सिरपच्या बाटल्या जप्त, एकाला अटक


सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : सणासुदीच्या दिवसात औषधांच्या नावाखाली विक्रीसाठी ठेवलेला नशेचा साठा दहीसर गावात जप्त करण्यात आला आहे. नागाव रोड परिसरातील गोदामातून ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोडीनयुक्त कफ सिरपच्या तीन हजार ७१५ बाटल्या जप्त केल्या. त्या बाटल्यांची किंमत सुमारे सात लाख ५८ हजार ९०७ रुपये असून, याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील मोहम्मद यासीन बाबू सलमानी (वय ३६) याला अटक करण्यात आली.
ठाणे शहर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस हवालदार अभिजित मोरे यांना १९ सप्टेंबरला या साठ्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने नागाव परिसरात गस्त घातली. त्यावेळी संशयीत एका तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला.
नागाव रोड येथील गोदामात ‘ओनेरेक्स कफ सिरप’ च्या बाटल्या आढळून आल्या. प्रत्येक बाटलीत कोडीन फॉस्फेट व ट्रायप्रोलिडीन हायड्रोक्लोराइड असल्याचे नमूद आहे. पोलिसांनी साठ्याबाबत परवाना आणि बिले मागितली असता ती उपलब्ध नसल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशेसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा केल्याची माहिती अटकेतील तरुणाने दिली. कारवाईदरम्यान त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणीचा आधिक तपास डायघर पोलिसांकडून सुरू असून, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com