जाेतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान

जाेतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान
Published on: 

मुंबई, ता. २ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी ‘क्रांतिसूर्य महात्मा जाेतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर तसेच अधिनस्त नगर भूमापन अधिकारी कार्यालयांशी संबंधित अर्धन्यायिक अपील प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांमध्ये तीन ठिकाणी लोक अदालत कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. पहिला कॅम्प अंधेरीसाठी २२ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा कार्यालय, प्रशासकीय इमारत, १०वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे होईल. या कॅम्पमध्ये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर तसेच नगर भूमापन अधिकारी, वांद्रे, अंधेरी आणि विलेपार्ले कार्यालयांशी संबंधित प्रकरणांचा समावेश असेल.

दुसरा कॅम्प कुर्ल्यासाठी २४ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता नगर भूमापन अधिकारी, घाटकोपर कार्यालय, टोपीवाला कॉलेज इमारत, मुलुंड (पूर्व), मुंबई येथे होईल. या कॅम्पमध्ये नगर भूमापन अधिकारी, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला आणि चेंबूर कार्यालयांशी संबंधित प्रकरणांचा समावेश असेल. तिसरा कॅम्प बोरीवलीसाठी २५ मार्च २०२७ मध्ये सकाळी ११.३० वाजता नगर भूमापन अधिकारी, बोरिवली कार्यालय, तहसीलदार व नगर भूमापन अधिकारी कार्यालय इमारत, चौथा मजला, डॉ. न. रा. करोडे मार्ग (नाटकवाला लेन), एस. व्ही. रोड, शिंपोली सिग्नल, बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे होईल. या कॅम्पमध्ये नगर भूमापन अधिकारी, बोरिवली, मालाड आणि गोरेगाव कार्यालयांशी संबंधित प्रकरणांचा समावेश असेल.

या अभियानांतर्गत भूमी अभिलेख विभागाच्या संबंधित कार्यालयांशी निगडित प्रलंबित अर्धन्यायिक अपील प्रकरणांमधील दोन्ही पक्षकारांची परस्पर संमती व तडजोड होऊ शकणारी प्रकरणे तातडीने निपटाऱ्यासाठी सादर करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com