कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल

कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल
Published on: 

मुंबई, ता. २ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे जलदगतीने निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठात ‘विद्यार्थी-कुलगुरू संवाद’ उपक्रमाचे शुक्रवारी (ता. २) आयोजन करण्यात आले हाेते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील विद्यार्थीकेंद्री, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या संकल्पनेला अनुसरून ‘एनईपी कनेक्ट’ उपक्रमांतर्गत हा संवाद आयोजित करण्यात आला.

मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या विद्यार्थी संवाद उपक्रमात सोमय्या महाविद्यालयातील अनुराग चौरसिया या विद्यार्थ्याच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यात आले. या विद्यार्थ्याची ५व्या सत्राची प्रलंबित असलेली गुणपत्रिका तयार करून विद्यार्थ्यास हस्तांतरित करण्यात आली. त्याचबरोबर दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या पात्रता प्रकरणावर तत्काळ सुनावणी घेत निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया करण्यात आली. प्रत्येक प्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज भवन (नवीन परीक्षा भवन) येथे झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न थेट विद्यापीठ प्रशासनासमोर मांडले. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत संबंधित विभागांकडून आवश्यक कार्यवाही करण्यावर या वेळी भर देण्यात आला.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या या संवादास प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपक्रम ठरताेय प्रभावी व्यासपीठ
‘विद्यार्थी-कुलगुरू संवाद’ हा केवळ तक्रार निवारणाचा उपक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या सूचना, अडचणी आणि अपेक्षा थेट विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचविणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे विद्यापीठाच्या प्रशासकीय सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि विद्यार्थीहितैषी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई : विद्यार्थी संवाद उपक्रमात अनुराग चौरसिया याच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com