

डोंबिवली, ता. ४ (वार्ताहर) : कल्याण-शीळफाटा मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या डोंबिवली शहर शाखेतर्फे रविवारी (ता. ११) जनआंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता शीळफाटा जंक्शन येथे हे आंदोलन होणार असून, कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
कल्याण-शीळफाटा मार्गावर मेट्रोचे काम, रस्त्याची अपुरी क्षमता, अवजड वाहनांची वाढती वर्दळ आणि अपुरे वाहतूक नियोजन यामुळे काही काळापासून कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने दररोज हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही कोंडीचा फटका बसत असल्याचे मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी सांगितले. अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करून त्यांच्या वेळांवर निर्बंध आणण्यासह वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तात्पुरत्या उपायांऐवजी कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित यंत्रणांनी ठोस कृती करावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.