सदनिकेच्या प्रलोभनाने फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकाला अटक

सदनिकेच्या प्रलोभनाने फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकाला अटक
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : भिवंडीतील काल्हेर येथे सदनिका देण्याचे देण्याचे दाखवून नागरिकांची तब्बल ७० लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने नवी मुंबईतून अटक केली. शामराव शंकरराव शिंदे (४५, रा. पिंपळी, जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

नौपाडा पोलिस ठाण्यात २०१८ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. शामराव शिंदे, रामदास शिंदे आणि इतर संशयितांनी काल्हेर येथे सदनिका देण्याचे आश्वासन फिर्यादी व इतर साक्षीदारांना दिले. मात्र, सदनिका न देता त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू असताना पोलिसांनी शामराव शिंदे याच्या मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्या माहितीच्या आधारे सातारा, अलिबाग, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात त्याचा शोध घेण्यात आला. अखेर त्याला नवी मुंबई परिसरातून २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. शिंदे याच्याविरुद्ध ठाणे पोलिस आयुक्तालयातील नौपाडा, वागळे इस्टेट आणि वर्तकनगर पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे एकूण सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com